Mumbai Chunabhatti Firing News : मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतर्गत वादातून पप्पू येरुणकरवर हा गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्यासोबत इतर चार लोकांवरही गोळीबार करण्यात आला. जखमींना सध्या सायन रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
चुनाभट्टीतील आझाद गल्ली परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी 16 राऊंड फायर करण्यात आले आहेत. येरुणकर सोबत इतर तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. या गजबजलेल्या परिसरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
अंतर्गत वादातून हल्ला
पप्पू येरुणकर हा स्थानिक गुंड असल्याची माहिती असून त्याच्यावर अंतर्गत वादातून हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पप्पू येरुणकर याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून तो याआधी तुरुंगातही जाऊन आला आहे. तसेच त्याचे अनेक लोकांसोबत जुने वाद आहेत. त्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.
गोळीबार झालेल्या व्यक्तींची नावं
(1) सुमित येरुणकर वय 46 वर्ष- याच्या पोटाला व डाव्या खांद्याला अशा दोन गोळया लागल्या आहेत.(मयत )
(2) रोशन निखिल लोखंडे वय 30 वर्ष. याच्या उजव्या मांडीला एक गोळी लागली आहे.
(3) मदन पाटील वय 54 वर्ष, यांच्या डाव्या काखेत एक गोळी लागली आहे.
(4) आकाश खंडागळे, वय 31 वर्ष, याच्या उजव्या हाताच्या दंडावरती एक गोळी लागली आहे.
(5) त्रिशा शर्मा, वय 8 वर्ष, हिच्या उजव्या हाताला गोळी लागली आहे.
ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण हे अत्यंत गजबजलेलं आहे. या परिसरात अनेक दुकानं असून त्या ठिकाणच्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्य या घटनेमुळे चुनाभट्टी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: