Thane News Updates: ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa) एकच दिवशी झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. तर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.  13 ऑगस्ट 2023  रोजी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


13 ऑगस्ट 2023 रोजी कळवा हॉस्पिटल मधील 18 रुग्ण दगावल्यानंतर कळवा हॉस्पिटल मधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठीत करण्यात आली होती. या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून त्या संपूर्णपणे प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती. या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ विभाग आयुक्त ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त आरोग्य सेवानिर्देशक मुंबई सहाय्यक निर्देशक आधी अधिकारी होते. कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते. त्यातच याच मृत्यूकांडाबद्दल हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता.


चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार


या प्रकरणात दोन डॉक्टर हे त्याच कळवा हॉस्पिटलमध्ये शिकावू डॉक्टरांना प्रशिक्षण देत असून त्या ठिकाणी काम देखील करतात अशा डॉक्टरांकडून या प्रकरणाची उत्तरे मागितली होती. परंतु ज्यावेळी मृत्यू झाले त्यावेळी ते वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते आणि यांनी दिलेल्या उत्तरामध्ये आयुक्तांना त्यांची बाजू न कळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने हॉस्पिटलचे अधीक्षक राजेश बरोट आणि त्यांचे मेडिसिन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर दोन ज्युनिअर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर आता अधिकची चौकशी करत गठीत कमिटीकडून या चौघांना देखील नोटीस लवकरात लवकर जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.


तर कळवा हॉस्पिटल मधील 18 जणांच्या मृत्यूकांड प्रकरणावरून कळवा हॉस्पिटलमधील दोन वरिष्ठ अधिकारी आणि दोन ज्युनिअर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार पाहायला मिळते. एबीपी माझाच्या बातमीमुळे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. त्यामुळे चौकशी समिती बसून आज कारवाई झाली.


रुग्णालयाच्या त्रुटींबाबत वेधलं लक्ष...


अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आला नसला तरी रुग्णालयांच्या त्रुटींबाबत मात्र या चौकशी समितीनं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. रुग्णालायाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत? याबाबत कोणी बोलायला तयार नाही. चौकशी समितीनं सुचवलेल्या सुधारणांबाबत तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार का? याबाबतही साशंकता आहे.