Most Selling Bikes in November 2023 : भारतात दर महिन्याला लाखो बाईक्सची (Bike) विक्री होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत एकूण 16 लाख 23 हजार 399 दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत देशभरात एकूण 12 लाख 36 हजार 281 दुचाकींची विक्री झाली होती. याचा अर्थ, या वर्षी दुचाकीच्या विक्रीत 31.3% वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 बाईक्सची यादी पाहूया.


स्प्लेंडर आणि शाईनची सर्वाधिक विक्री


या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आणि होंडा शाईन (Honda Shine) सारख्या एंट्री-लेव्हल बाईक्सनी अनुक्रमे 2,50,786 युनिट्स आणि 1,55,943 युनिट्स विकल्या, ज्यामुळे त्यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला. दोन्ही मोटरसायकल अनुक्रमे 100cc आणि 100cc/125cc इंजिनसह येतात. स्प्लेंडरच्या विक्रीत वार्षिक 5.57 टक्क्यांनी घट झाली, तर शाईनची विक्री 35.46 टक्क्यांनी वाढली.


पल्सर, एचएफ डिलक्स आणि प्लॅटिनाची विक्री


बजाज पल्सर (Bajaj Pulsar), हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) आणि बजाज प्लॅटिना (Bajaj Platina) या बाईक्स नोव्हेंबर महिन्यात विक्रीच्या बाबतीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर होत्या. या तिन्ही कंपन्यांच्या विक्रीत वार्षिक 79-80% इतकी समान वाढ नोंदवली गेली. या कालावधीत पल्सरने 1,30,403 युनिट्स, हिरो एचएफ डिलक्सने 1,16,421 युनिट्स आणि बजाजने प्लॅटिनाच्या 60,607 युनिट्सची विक्री  केली. पल्सरच्या लाइनअपमध्ये जवळपास डझनभर मॉडेल्स आहेत.


अपाचे, रेडर आणि पॅशनची विक्री


पल्सरप्रमाणेच TVS Apache अनेक मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये, अपाचे मोटरसायकलच्या 41,025 युनिट्सची विक्री झाली, जी वार्षिक आधारावर 51.26% वाढली. तर TVS Raider ने गेल्या महिन्यात 39,929 युनिट्सची विक्री केली. ज्यामध्ये 47.53% ची वाढ नोंदवली गेली आहे. हिरोने गेल्या महिन्यात पॅशनच्या 34,750 युनिट्सची विक्री केली आणि वार्षिक आधारावर 1168% ची मोठी वाढ नोंदवली. 


क्लासिक 350 आणि ग्लॅमरची विक्री


रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या क्लासिक 350 च्या 30,624 युनिट्सची विक्री केली आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते नवव्या स्थानावर आहे. तर दहाव्या क्रमांकावर हिरो ग्लॅमरने 20,926 युनिट्स विकल्या.


नोव्हेंबरमध्ये टॉप 10 विकल्या गेलेल्या बाईक्स


1. हिरो स्प्लेंडर (Hero Splendor)
2. होंडा शाईन(Honda Shine)
3. बजाज पल्सर (Bajaj Pulsar)
4. हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)
5. बजाज प्लॅटिना (Bajaj Platina)
6. TVS अपाचे (TVS Apache)
7. TVS रेडर (TVS Raider)
8. हिरो पॅशन (Hero Passion)
9. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 (RE Classic 350)
10. हिरो ग्लॅमर (Hero Glamour)


हेही वाचा:


Diesel Bike: पेट्रोल नव्हे, तर डिझेलवर चालायची Royal Enfield ची 'ही' बाईक; मायलेज 80kmpl


Car loan Information:

Calculate Car Loan EMI