Mumbai: सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर (Social Media) खोटे अकाऊंट ओपन करुन काही लोक फसवणुक करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाउंट ओपन करुन मुलींची चॅटिंग करणाऱ्या इंजिनियरला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी शनामुगावडीवेल थणगावेल (31) हा इंजिनिअर आहे. तो तामिळनाडू येथील रहिवासी असून वर्सोवा (Versova) पोलिसांनी त्याला तामिळनाडू (Tamil Nadu) येथून अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने फेसबुकवर बोगस अकाउंट ओपन केले होते. यावरून तो सिनेमात काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना काम देण्याचे कबूल करून त्यांच्याकडून बायोडाटा मागवून तरुणीशी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांचे बोल्ड फोटो मागवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब काही तरुणींनी दिग्दर्शक श्रीराम राघवन सुंदरा राघवन यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर राघवन यांनी यासंदर्भात वर्सोवा पोलीस स्टेशन येथे 23 मार्च रोजी तक्रार नोंदवली.


घटनेचे गांभीर्य पाहून वर्सोवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले. यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हा परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले यानंतर वर्सोवा पोलिसांच्या एक पथकाने त्रीचोनगोड तामिळनाडू येथून आरोपीस ताब्यात घेतले आरोपीला न्यायायलायात हजर करण्यात आल्यानंतर आता आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे. या  इंजिनिअरने मुंबईमध्ये किती मुलींना अशा पद्धतीने फसवला आहे? या संदर्भात वर्सोवा पोलीस या अधिक तपास करत आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: