68th National Film Awards 2022: नवी दिल्ली येथे आज (30 सप्टेंबर) 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. हा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. हा पुरस्कार सोहळ्याला संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे ज्याची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली. पाहा 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी-
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सूराराई पोट्ट्रू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी
सर्वोत्कृष्ट अभिनेता: सूराराई पोट्ट्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या आणि तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कारः एके अय्यप्पनम कोशियुम
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन
सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :Justice Delayed but Delivered & Three Sisters
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला
सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम
सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम
सर्वोत्कृष्ट पटकथा: सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन
सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम
चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश
'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत' मराठीचा बोलबाला
'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पाश्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: