Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरात खळबळजनक घटना घडली. एका हॉटेलच्या रुममध्ये 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या (Suicide) केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. "आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका," असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
मॉडलने स्वत:ला रुममध्ये बंद करुन घेतलं होतं
ही घटना बुधवारी (28 सप्टेंबर) रात्री घडली आहे. संबंधित मॉडेल ही अंधेरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेक वेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाजा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन कळवलं
पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मॉडेलचा मृतदेह आढळला
माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि मॉडेलची रुम मास्टर कीने उघडला. रुमचा दरवाजा उघडताच तिथे उपस्थितांना धक्का बसला. कारण ही मॉडेल पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. तिने रुममध्ये आत्महत्या केली होती
"मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती," रुममध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख
पोलिसांनी घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट देखील जप्त केली आहे. "माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही, कोणाला डिस्टर्ब करू नका, मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती," असं या मॉडेलने सुसाइड नोटमध्ये लिहिले होत.
दरम्यान वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन गुन्हा दाखल केला आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर संबंधित मॉडेल संदर्भात विस्तृत माहिती अद्याप प्रतिक्षेत आहे. ती कोण आहे, तिच्या आत्महत्येमागील कारण काय, हे पोलीस तपासात समोर येईल.