Congress President Election : येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) होणार आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते उत्सुक असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh ) हे देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्यानं दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे. मी खर्गे यांना समर्थन देत असून, त्यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करु शकत नसल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलं आहे. यापुढेही मी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आजचा (30 सप्टेंबर) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि केरळचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची चर्चा होती. तसेच मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे आणि कुमारी सेलजा हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र, आता दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी मल्लिकार्जून खर्गे यांनी आपलं समर्थनं दिलं आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे.
कमलनाथ यांच्याशी दिग्विजय सिंह यांनी केली चर्चा
दरम्यान, आज दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्याचवेळी अध्यक्षपदाची उमेदवारी नाकारणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. दिग्विजय सिंह यांनी सकाळी फोन करुन निवडणुकीसाठी फॉर्म भरणार नसल्याचे सांगितले होते. खर्गे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
नावनोंदणीचा शेवटचा दिवस
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (30 सप्टेंबर) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आठ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Congress President Election : दिग्विजय, थरूर यांच्यानंतर आता ही 4 नावे चर्चेत, नामांकन अर्जाच्या शेवटच्या दिवशी वाढणार सस्पेंस!
- Ashok Gehlot : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, अशोक गहलोत यांची घोषणा; सोनिया गांधींची माफीही मागितली