Dhule Crime : मध्य प्रदेश (Madhya Pradesh) परिवहन महामंडळाच्या बसमधून अवैध गावठी कठ्ठ्यांची वाहतूक सुरु होती. धुळ्यातील (Dhule) शिरपूर तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. पोलिसांनी अवैध कट्ट्यांची वाहतूक रोखली आणि एकाला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 73 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अवैध कट्ट्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर शिरपूर पोलिसांची कारवाई 
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मध्य प्रदेश राज्यातील बस क्रमांक एमपी 11 पी 66 69 या बसमधून गावठी कट्ट्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची एक बस पोलिसांना दिसताच त्यांनी ती बस थांबवून तपासणी केली. यावेळी या बसमधून रितेश श्यामलाल शर्मा (वय 24 वर्षे  राहणार सोलीपेंड तालुका जिल्हा जालिंदर) याच्याकडे असलेल्या एका काळ्या रंगाच्या बॅगमधून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने पाच पिस्तुलासह चार मॅक्झिन जप्त केले. या कारवाईत सुमारे 73 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


गावठी कट्टे कुठे आणि कोणाकडे जात होते?
खाजगी बससह परिवहन महामंडळाच्या बसमधून अमली पदार्थांसह गावठी कट्ट्यांची होणारी वाहतूक ही अत्यंत गंभीर बाब गेल्या काही दिवसात धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. मागील आठवड्यात खासगी ट्रॅव्हल्समधून होणारी गुटख्याची वाहतूक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रोखल्यानंतर, आता मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमधून होणारी गावठी कट्ट्यांची वाहतूक समोर आली आहे. हे गावठी कट्टे कुठे आणि कोणाकडे जात होते याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.


गावठी कट्ट्यांचा वापर वाढताच 
गावठी कट्ट्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. गुंडांच्या टोळ्या यातून वाढीस लागल्या आहेत. याच तस्करीतून संघटीत गुन्हेगारी वाढत असून, गावठी कट्ट्यांचा वापरही वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खान्देशातील जिल्ह्यांना मध्य प्रदेशची सीमा असल्याने महाराष्ट्रात सर्रास गावठी कट्टे येत असल्याचं समोर आलं आहे. 
परिणामी कट्टा तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या



Dhule Crime : गुजरातच्या शकुल कंपनीकडून महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची फसवणूक, 76 कोटी रुपयांचा गंडा