एक्स्प्लोर

Mumbai Crime : लहान मुलांकडे पाहून अश्लील हावभाव, कुलाबा पोलिसांकडून टॅक्सी चालकाला बेड्या

Mumbai Crime : लहान मुलांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील कुलाबा परिसरातील ही घटना आहे.

Mumbai Crime : लहान मुलांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला (Taxi Driver) पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) कुलाबा परिसरातील ही घटना आहे. सिकंदर खान (वय 35 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. तीन लहान मुलांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

कुलाबा पोलिसातील सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी दररोज कुलाबा परिसरातील मुलांच्या शाळेसमोर आपली टॅक्सी उभी करत असे आणि त्यांना पाहून अश्लील हावभाव करत असे. एवढंच नाही तर तो मुलांचा पाठलागही करत असे.

याची माहिती पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींनी आपल्या वर्ग शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकांनी याची खात्री करुन घेण्यासाठी स्वत: बाहेर जाऊन पाहिलं. मुली सांगितलेली बाब खरी असल्याची पटल्यानंतर शिक्षिकेने याची माहिती कुलाबा पोलिसांना दिली. संबंधित टॅक्सी चालकाविरोधात तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेत कुलाबा पोलिसांनी टॅक्सीच्या नंबरद्वारे आरोपी सिकंदर खानचा शोध घेतला. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 509 आणि पॉक्सोच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कांदिवलीत सह वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, अत्याचारानंतर चिमुकलीला मारहाण केली आणि या घटनेची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.

पीडित चिमुकली तिच्या घराजवळच खेळत होती. यावेळी 46 वर्षीय आरोपी तिथे आला. त्याने मुलीला पकडलं आणि निर्जन स्थळी घेऊन गेला. यानंतर तिच्यावर अत्याचार केले. सोबतच तिला मारहाण केली आणि घरातील कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र मुलीने याची माहिती आईला दिली. आईने मुलीला घेऊन कांदिवली पोलीस स्टेशन गाठलं, जिथे तिच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली.

शाळकरी मुलीची ओढणी खेचल्याने आरोपीला 3 वर्षांचा तुरुंगवास
तर मुंबईतील आणखी एका घटनेत विशेष न्यायालयाने 20 वर्षीय तरुणाला "लैंगिक हेतूने" शाळेत जाणाऱ्या मुलीचा "ओढणी" खेचल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकारामुळे पीडित आणि तिच्या कुटुंबियांच्या मनात दहशत निर्माण होत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray Nashik: कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार, आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, नेमकं प्रकरण काय?
कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार, आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
Chhatrapati Sambhajinagar News: जमिनीचा हिस्सा बहिणींना दिला अन्..., कुणालच्या कुटुंबातील वाद नेमका काय? चांदगुडेंच्या संसारात कोणाचा हस्तक्षेप? नवी माहिती समोर
जमिनीचा हिस्सा बहिणींना दिला अन्..., कुणालच्या कुटुंबातील वाद नेमका काय? चांदगुडेंच्या संसारात कोणाचा हस्तक्षेप? नवी माहिती समोर

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Embed widget