Mumbai Crime : मुंबईत लैंगिक अत्याचारासंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मीरा भायंदर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीविरोधात तब्बल 18 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत चेक केले. यानंतर आरोपी कल्पेश देवधरे याला अटक केली आहे.
मीरा-भाईंदर पोलिसांच्या काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने एका 30 वर्षीय तरुणाला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. आरोपीवर मुंबई आणि उपनगरात जवळपास 18 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. काशिमीरा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि त्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला कल्पेश देवधरे हा व्यवसायाने चालक असून तो कांदिवली येथील रहिवासी आहे.
त्याच्याविरुद्ध 18 एप्रिल 2022 रोजी नयानगर पोलिस ठाण्यात 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर कलम 376 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 च्या विविध कलमांखाली बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध कांदिवली, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव, चुनाभट्टी, पार्क साइट, कस्तुरबा, बांगूर नगर, पवई, माणिकपूर, गोवंडी, डीएन नगर, सायन, विलेपार्ले आणि कुरार यासह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान आरोपीने सांगितले की वयाच्या 16 आणि 17 व्या वर्षी तो त्यांच्या परिसरातील व्हिडिओ पार्लरमध्ये पॉर्न चित्रपट पाहत असे. त्याची मानसिकता महिला आणि लैंगिक गरजांबद्दलची आवड निर्माण करते.
हा तपास पोलीस उपायुक्त (गुन्हे) महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक अविराज कराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केला.
इतर बातम्या