Mumbai Rape Case : मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही. दक्षिण मुंबईत (South Mumbai) एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर (Rape Case) अत्याचार झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमीष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.


नूडल्सचं आमिष दाखवून 42 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार


आरोपीने शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनांच शिकार बनवलं. पीडित मुलींच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, आरोपी त्यांच्या शेजारी राहतो त्याने तीन मुलींना खाण्यापिण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिन्ही मुली आरोपीच्या घरात पोहोचताच त्यानं दरवाजा बंद केला, जेणेकरून कोणतीही मुलगी घरातून पळून जाऊ नये. त्यानंतर त्याने तिन्ही मुलींवर अत्याचार केला.


पीडित मुलींनी आईला सांगितला घडलेला प्रकार


पीडितेच्या आईने पोलिसांना माहिती देत पुढे सांगितलं की, आरोपीने तिन्ही मुलींवर अत्याचार केला. जेव्हा मुली आरोपीच्या घरून आपल्या घरी परतल्यावर त्यांनी आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. मुलींनी हे सांगताच आईंना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.


पोलिसांनी आरोपीला केली अटक


मुलींनी सांगितलेली घटना ऐकल्यावर आईने जे.जे. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. जे.जे. मार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे यांनी एबीपीला माहिती देताना सांगितलं की, आईच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


आरोपीला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे यांनी पुढे सांगितलं की, आरोपीला अटक केल्यानंतर आम्ही त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 376, 367(ब), 377, 341 आणि पॉक्सो कलम 4, 5 आणि 12 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी ठरल्या आहेत. नूडल्सचं आमिष दाखवून 42 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं. लाखो लोक स्वप्न घेऊन या शहरात येतात. पण येथे लहान मुलीसुद्धा सुरक्षित नसतील तर ही फार चिंतेची बाब आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, हीच मागणी जनसामान्यांकडून करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai News : मोठी बातमी! दहशतवादाचा कट उधळला? संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा