NIA Updates : राष्ट्रीय तपास यंत्रणानी (NIA) दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला (Sarfaraz Memon) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA ने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. NIA ने माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे. 


संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात


सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती NIA ने दिली होती. या माहितीच्या आधारे NIA ने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. NIA च्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.






NIA ने दिला होता धोक्याचा इशारा


एनआयएकडून (NIA)मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सतर्क राहण्याचा ई-मेल (E-Mail) पाठवण्यात आला होता. त्यानुसार, तपास यंत्रणाकडून तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.


संशयित दहशतवाद्याचं चीन, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण


मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अशी माहिती NIA ने मेलद्वारे पोलिसांना दिली होती. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रंही पाठवली होती. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. यानंतर इंदूर पोलिसांनी संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.


दहशतवादाचा कट उधळला?


मुंबई शहर कायमच दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी राहिलं आहे. 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्यांपासून मुंबईसारख्या शहरांचं संरक्षण केलं आहे. दरम्यान, आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याच्या चौकशीनंतर याबाबतीत पुढील माहिती समोर येईल. तपास यंत्रणांकडून या कामांना वेग आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai News: सतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना ई-मेल; मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचाही उल्लेख