Mumbai Crime News : हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी मुंबई हादरली आहे. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे लालबागच्या चिवडा गल्लीत भावाकडूनच धाकट्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हत्येच्या दोन घटनांनी हादरली आहे. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अँटॉप हिल परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळी यासंदर्भात गुन्हा नोंदवला असून याबाबत अधिक तपास सुरु आहे. मृत तरुणाचं नाव अब्दुल सलाम मुनावर अली सय्यद असून त्याचं वय 29 वर्ष आहे. अब्दुलला काही लोकांनी अँटॉप हिल परिसरातील केंद्रीय लोक निर्माण विभाग कार्यालयाच्या मागे बोलावलं होतं. त्यानंतर त्याला मारहाणही करण्यात आली होती. मारहाण झाल्यामुळे अब्दुल गंभीर जखमी झाला आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
आणखी एका घटनेनं मुंबई हादरुन निघाली. मुंबईतील गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबाग-परळमध्ये मोठ्या भावानं आपल्या लहान भावाची चाकू भोकसून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग काळाचौकी परिसरात मोठ्या भावानं आपल्या लहान भावाची हत्या केली. मोठ्या भावाच्या मित्रासोबत लहान भावाचं भांडण झालं होतं. त्यानंतर राग अनावर झालेल्या मोठ्या भावानं आपल्याच सख्या लहान भावावर चाकून हल्ला केला. या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला. मृत लहान भावाचं नाव आकाश भरुगडे असं आहे. तर मोठ्या भावाचं नाव अशोक भरुगडे असं आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Crime News : परभणी: खळबळजनक! रुग्णालय परिसरात दगडाने ठेचून एकाची हत्या
- विरारच्या समय चौहान हत्येप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल, दोन जण अटकेत
- हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, वसईमधील घटनेने खळबळ
- Ambernath: दहावीच्या परीक्षेला घाबरून 16 वर्षाच्या मुलीनं रचला अपहरणाचा बनाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha