मुंबई : मुंबई (Mumbai) मधील गोरेगाव (Goregaon) पूर्व परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला लग्नसाठी नकार दिला. त्यानंतर त्या युवकानं त्याच्या प्रेयसीच्या सात महिन्याच्या भावाचं अपहरण केलं. नंतर आरोपीनं तिच्या भावाला पाण्याच्या टाकित फेकून त्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी रात्री सात महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून बाळाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्या बाळाच्या बहिणीच्या आरोपी प्रियकरानं सात महिन्याच्या बाळाची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं.
पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्या आरोपीनं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी त्याचं आणि त्याच्या प्रेयसीचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर त्या मुलीनं तिच्या प्रियकराला लग्नासाठी नकार दिला. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आरोपीनं सात महिन्याच्या बाळाचं अपहरण करून त्याच्या कॉलेजच्या जवळच्या पाण्याच्या टाकीमध्ये फेकून दिले. त्यानंतर त्या बाळाची मृत्यू झाला.
आरोपीचं नाव कन्नम मुथु स्वामी असं आहे. या 28 वर्षाच्या आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हा आरोपी आरे कॉलनीमध्ये राहतो तर त्याची प्रेयसी तिच्या कुटुंबासोबत फुटपाथवर राहते.
हे देखील वाचा-
- Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये उधारी मागितली म्हणून चायनिज विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
- बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण
- घर नावावर करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट सही, शिक्याचा वापर; गुन्हा दाखल
- Hijab Row : "उच्च न्यायालयाने इस्लामिक नियमांचा चुकीचा अर्थ लावला", मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही SC पर्यंत पोहोचले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha