IPL 2022, GT vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ मैदानात उतरणार असून दोन्ही संघाचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना असेल. दोन्ही संघानी महालिलावात अनेक तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात सामिल केले आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही. पण या लढतीत काही खेळाडूंना विविध कारणांमुळे खेळता येणार नाही. 


गुजरातकडून 'हे' खेळाडू मुकणार पहिला सामना


अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्ला गुरबाज याने इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय याच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. पण नुकताच संघात आल्याने तो पहिल्या सामन्याला मुकू शकतो. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामने सुरु असल्याने वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ देखील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 


लखनौचे 'हे' खेळाडू नसतील पहिल्या सामन्यात


इंग्लंडच्या वेस्टइंडीज दौऱ्यावर दुखापतीमुळे मार्क वुड IPL 2022 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायला संघात घेतलं आहे. तर दुसरीकडे जेसन होल्डर आणि काइल मेयर्स यांचीही आयपीएलच्या पहिल्या आठवड्यानंतर संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण संध्या ते दोघेही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्टइंडीज संघात खेळत आहेत. मार्कस स्टॉयनीसही पाकिस्तान दौऱ्यामुळे या सामन्याला मुकणार आहे.


गुजरातचे संभाव्य अंतिम 11


हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, रहमानुल्लाह गुरबाज, अभिनव मनोहर, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, राशिद खान, डेविड मिलर, आर किशोर, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन


लखनौचे संभाव्य अंतिम 11


केएल राहुल (कर्णधार), क्विंंटन डि कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मनन वोहरा, जेसन होल्डर, क्रुणाल पंड्या, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, आवेश खान, रवी बिश्नोई


हे देखील वाचा-