मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी एका अशा आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी तुमची गरज ओळखून तुम्हाला टार्गेट करुन तुमची फसवणूक करत होते. ॲाक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो, लस मिळवून देतो असा स्वरुपाच्या खोटे फोन खोटी जाहिरात करुन ही टोळी देशात अनेकांची फसवणूक करत होती. या करता ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत होती.
देशात 18 ते 44 वयाच्या नागरीकांना लसीकरण दिले जात नव्हते. तेव्हा सोशल मीडियावर जाहिरात यायच्या तसच नंतर फोन यायचे कमी पैशांत पुढील काही तासात वॅक्सिन पाहिजे असेल तर या नंबर पैसे पाठवा. ॲाक्सिजन सिलेंडर पाहिजे, रेमडिसिवीर इंजेक्शन पाहिजे एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो असे फोन मेसेज आणि जाहिराती येतात ज्यांना गरज असते ते अशा फोन मेसेज आणि जाहिरातींना संपर्क करतात आणि वाट पाहत बसतात आणि त्यांना वाटच पाहावी लागते. कारण हे असे फोन मेसेज आणि जाहिरात खोट्या असतात. गरजवंत माणसांची नड लक्षात घेवून अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते. अशाच एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी पर्दाफाश केला.
सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. जे सर्व उच्चशिक्षित असून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भाग कत्रीसराय, बिहार शरीफ आणि वारसलिंगज येथून टोळक्याने काम करत होते. जमतारा सारख्या वेब सीरीजप्रमाणे या टोळीने देखील त्यांचे कॉल सेंटर थाटले होते.
प्राथमिक तपासातच या टोळीचे मोठं मोठे कारनामे समोर आलेत
- या टोळक्याने अनेक मोठ्या कंपन्या आणि हॉस्पिटल तसच काही राज्यांच्या शासकीय स्वरुपाच्या बोगस जाहिराती बनवल्या होत्या.
- या टोळक्याने प्राथमिक तपासानुसार गेल्या काही दिवसातच 210 जणांची फसवणूक केली.
- मध्यरात्री दोनच्या सुमारास बिहार पोलिसांच्या मदतीने सायबर क्राईम पोलिसांनी या टोळक्यावर जेव्हा धाड टाकली होती.
- ही टोळी सतत मोबाईल नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर बदलायची.
- या टोळीचे 32 बनावट बॅंक खाते जप्त करण्यात आले.
- गेल्या काही दिवसातच या टोळीने जवळपास 60 लाख रुपये फसवणूक करुन मिळवले होते.
- तर, या टोळीला कोलकात्यातून बोगस सिम कार्ड पुरवले जायचे.
या अशा प्रकारच्या उच्च शिक्षित हायटेक आर्थिक फसवणूक करणा-या टोळ्या काळानुरुप गरजा लक्षात घेऊन जाळं तयार करतात. सायबर पोलिसांनी पकडलेल्या टोळीने तर कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असल्याने यावेळेस कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करता येईल याची देखील तयारी केली होती. पण त्या आधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. खरं तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण स्वत:चा बचाव करु शकता. याकरता फक्त एकच करा शासकिय वेबसाईट किंवा सुरक्षित वेबसाईट आणि अधिकृत वेबाईसाईट किंवा लिंकचाच वापर करायचा नाही तर तुमची फसवणूक झालीच.
संबंधित बातम्या :