मुंबई: मरिन लाईनजवळील एका मुलीच्या वसतीगृहातील 19 वर्षीय मुलीच्या हत्येचं गुढ काही तासातच उलगलडं आहे. त्या वसतीगृहाच्या वॉचमनने तिच्यावर अतिप्रसंग करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्या वॉचमनने स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. 


आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल 18 वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमधील काही सीसीटीव्ही चेक करण्यात आले होते. त्या आधारे आरोपीची ओळख झाली असून त्याच्या परिवाराशीसुद्धा संपर्क साधण्यात आलेला आहे. 


आरोपीच्या खिशातून दोन चाव्या सुद्धा सापडले आहेत अशी पोलिसांची माहिती आहे. रेल्वे पोलिसांनी या संदर्भात ADR दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच ही मुलगी बांद्रामधील एका कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षीय विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील एका स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करतात.


काय आहे प्रकरण?


मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात (Savitridevi Phule Girls Hostel) 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पोलिसांना एक कॉल आला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृत सापडली आहे आणि दरवाजा बाहेरून लॉक आहे. 


गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय 


मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची हाताने गळा दाबून हत्या (Marine Line Hostel Girl Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. ही हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, रात्री त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलिस स्टेशनच्या (Charni Road Murder) जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला. या वॉचमनचे नाव ओमप्रकाश कनौजिया असं असून त्याचं वय 53 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. 


ही संबंधित बातमी वाचा :