मुंबई: मरिन ड्राईव्ह जवळ असलेल्या वसतीगृहामध्ये आज एका मुलीचा मृतदेह (Marine Line Hostel Girl Murder) आढळला. या मुलीची हत्या करण्यात आली असून त्याचा संशय वसतीगृहाच्या वॉचमनवर (Girl Murder Suspected Watchman) होता. पण आता या घटनेला वेगळं वळण लागलं असून संशय असलेल्या वॉचमनचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात (Savitridevi Phule Girls Hostel) 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पोलिसांना एक कॉल आला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृत सापडली आहे आणि दरवाजा बाहेरून लॉक आहे. 


गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय 


मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची हाताने गळा दाबून हत्या (Marine Line Hostel Girl Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. आता त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलिस स्टेशनच्या (Charni Road Murder) जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला. या वॉचमनचे नाव ओमप्रकाश कनौजिया असं असून त्याचं वय 53 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. 


मरीन ड्राईव्ह पोलीस (Marine Drive Police) सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे. 


दुपारी मुलीची हत्या आणि रात्री या हत्येतील संशयित आणि बेपत्ता असलेल्या वॉचमनचा मृतदेह आढळून आल्याने या खळबळ उडाली आहे. आता या मृत्यूचं गुढ लवकरात लवकर उघडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. 


मुलगा लटकलेल्या अवस्थेत तर आईचा मृतदेह बेडरुममध्ये आढळला


मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नमवारनगरमध्ये 22 वर्षीय तरुण घरातील सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला तर त्याच्या आईचा मृतदेह बेडरुममध्ये सापडला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना 4 जून रोजी समोर आली होती.


कन्नमवारनगरमधील गुलमोहर सोसायटीच्या बी विंगमधील रुम नंबर 203 मध्ये दोन जण मृतावस्थेत सापडले. महिलेचा पती रविवारी (4 जून) त्यांना भेटण्यासाठी आला होता. परंतु दरवाजाची बेल वाजवूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने संजय तावडे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. 


ही बातमी वाचा: