एक्स्प्लोर

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं, चार चिमुकल्यांनी जीव गमावला

Mobile Blast At Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होळीच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना तुम्हा सर्वांचाच थरकाप उडवेल. मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक दुर्घटना घडली.

Mobile Blast And Four Kids Died: नवी दिल्ली : आपल्याला मोबाईल (Mobile) संभाळून वापरण्याचा सल्ला थोरामोठ्यांकडून सर्रास दिला जातो. यामागील हेतू तो हरवेल म्हणून नाहीतर, हातातल्या मोबाईलमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, असा असतो. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होळीच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना तुम्हा सर्वांचाच थरकाप उडवेल. मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक दुर्घटना घडली. या घटनेत एक, दोन नाहीतर तब्बल 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी चार मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. 

होळीपूर्वी उत्तर प्रदेशात एका घरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील चा मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना ज्या खोलीत घडली, तिथे एक इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला होता. अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या बाहेर आल्या. यानंतर ठिणगी पडल्यानं बेडवरील फोमच्या गादीनं पेट घेतला आणि आग लागली. पाहता पाहता आग संपूर्ण खोलीत पसरली. काही मिनिटांतच संपूर्ण खोली आगीच्या भक्ष्यस्थानी आली. 

नेमकं काय घडलं? 

खोलीत आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब होतं. पती-पत्नी आणि त्यांची मुलं असे सहाजण खोलीत होते. पती-पत्नीनं आपल्या मुलांसह जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आग संपूर्ण खोलीत पसरली होती. घरातील सर्वचजण होरपळून निघाले. आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेत, घरातील सर्वांना बाहेर काढलं. त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना मेरठच्या, लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं.  

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवाशी असलेल्या जॉनीचं संपूर्ण कुटुंब जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होतं. जॉनी हा रोजंदारीवर काम करतो. होळीच्या सुट्टीमुळे जॉनी शनिवारी घरीच होता आणि त्याची पत्नी बबिता स्वयंपाक करत होती. खोलीत त्याची मुलगी सारिका (10), निहारिक (8), मुलगा गोलू (6) आणि मुलगा कालू (5) खेळत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान निगरिक आणि कालू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे आगीत होरपळून निघालेल्या इतर दोन मुलांनीही आपला जीव सोडला. तर मुलांचे आई-वडीलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाईल चार्जिंगला असताना अचानक त्याचा स्फोट झाला. यानंतर संपूर्ण घर जळून खाक झालं. आगीत पालक आणि चार मुलं होरपळून निघाली. परिसरातील लोकांचं म्हणणं आहे की, अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली. यानंतर सर्वांनी एकमेकांना वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली, पण तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget