एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बांगलादेशी समजून तिघांना जबर मारहाण

Bhiwandi Crime : शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी आश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहे. 

ठाणे : भिवंडी शहरातील हनुमान नगर परिसरात  राहणाऱ्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. या चिमुरडीला 20 वर्षांच्या नराधमाने घरी नेऊन विनयभंग केला. त्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर जमलेल्या जमावाने तीन लोकांना बांगलादेशी असल्याचं समजून जबर मारहाण केली. यासीन शेख असे विनयभंग करणाऱ्या तरुणाचे नाव असून सध्या तो फरार आहे. 

नऊ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याच्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. तेथील जमावाने घरी राहणाऱ्या तिघांना बांगलादेशी असल्याचे समजून जबर मारहाण केली. सध्या याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र हे सर्व बांगलादेशी नसून झारखंड येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे.

भिवंडी शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. त्यावेळी घरात 9 वर्षीय चिमुरडी आणि तिचा लहान भाऊ एकटे असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावली आणि स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीचे वस्त्र उतरवून तिच्यासोबत आश्लिल चाळे केले. 

हा सर्व प्रकार तिच्या अल्पवयीन मुलीच्या लहान भावाने पाहिला आणि आई-वडील घरी आल्यानंतर त्यांच्या कानावर घातला. तेव्हा आई वडिलांसह स्थानिक त्या तरुणाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. मात्र हा तरुण तेथून फरार झाला होता. परंतु त्या तरुणासह घरात राहणाऱ्या तिघांना जमावाने बांगलादेशी समजून जबर मारहाण केली. 

या घटनेची माहिती तात्काळ भिवंडी शहर पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हे बांगलादेशी नसून ते साहेबगंज, थाना नादानगर  झारखंड येथील निवासी असल्याच उघड झाले. 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत आरोपी यासीन सोभारुख शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत . 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget