एक्स्प्लोर

Mangaluru Blast Case : रिक्षामधून कुकर बॉम्ब घेऊन जात होता आरोपी, अचानक झाला स्फोट; दहशतवादी कट असल्याची पोलिसांची माहिती

Mangaluru Blast Case : कर्नाटकातील मंगळुरू येथे शनिवारी झालेल्या ऑटो स्फोटाच्या घटनेचा दहशतवादी अँगल समोर आला आहे. ऑटोमध्‍ये प्रवास करणार्‍या प्रवाशाने बॅगेत कुकर बॉम्ब ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला.

Mangaluru Blast Case : कर्नाटकातील ( Karnataka ) मंगळुरुमध्ये ( Mangaluru ) एका ऑटो रिक्षामध्ये ब्लास्ट झाला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 19 नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली. ऑटो रिक्षामध्ये कुकर बॉम्ब होता. या बॉम्बचा स्फोट झाल्याने रिक्षाचालकासह प्रवासीही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक आणि प्रवासी आरोपीचा समावेश आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास सुरु आहे. ही घटना दहशतवादी कट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दहशत पसरवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणीस आरोपींकडून ब्लास्ट करण्यात येणार होता, मात्र चुकून रिक्षातच या कुकर बॉम्बचा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना आरोपी प्रवासीकडून बॅटरी, वायर आणि सर्किट असलेला कुकर जप्त केला आहे.

कर्नाटकातील मंगळुरू येथे शनिवारी झालेल्या ऑटो स्फोटाच्या घटनेचा दहशतवादी अँगल समोर आला आहे. ऑटोमध्‍ये प्रवास करणार्‍या प्रवाशाने बॅगेत कुकर बॉम्ब ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला. कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणात सांगितलं की,  मंगळुरूमधील ऑटोमध्ये झालेला स्फोट हा अपघात नसून दहशतवादी घटना आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले की, या प्रकरणी संशयित दहशतवाद्याली मदत केल्याचा आरोपात कर्नाटकात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्य आरोपीने अन्य ठिकाणी स्फोट घडवण्याची योजना आखली होती, मात्र चुकून नागुरी येथे स्फोट झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

संशयित आरोपी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितलं की, संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घटनास्थळावरून जप्त केलेल्या आधारकार्डमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आहेत. संशयिताकडे डुप्लिकेट आधार कार्ड होते. त्यात हुबळीचा पत्ता होता. या प्रकरणाच्या कर्नाटक पोलिसांसोबत तपासात एनआयए आणि आयबीचे अधिकारीही मिळून तपास करत आहेत. संशयित आरोपी ब्लास्टमध्ये जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.

आरोपीच्या घराची झडती घेतली

म्हैसूर शहर पोलिसांनी मंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या रविवारी (20 नोव्हेंबर) घराची झडती घेतली आणि काही साहित्य जप्त केलं. शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्याजवळ एका ऑटोरिक्षात स्फोट झाला, त्यात प्रवासी आणि चालक जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काय म्हणाले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितलं की, मंगळुरू येथे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या संशयिताचे दहशतवादी संबंध आहेत. कारण त्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूरसह विविध ठिकाणी भेट दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget