एक्स्प्लोर

Mumbai crime : इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार आणि पैसेही उकळले; आरोपी डॉक्टरला बेड्या

Mumbai Crime News : संबंधित डॉक्टर आरोपीवर या आधीही बलात्काराचे तीन गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. 

मुंबई: इन्स्टाग्रामवरून (Instagram) ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी (Malvani Police) अटक केली आहे. सदरच्या आरोपीने या महिलेकडून सोनं आणि पैसेही उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच याशिवाय इतरही महिलांशी त्याचे संबंध असून त्यांनाही लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचं समोर आलं आहे. योगेश सुनील भानुशाली (33 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत. 

आरोपी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून (Instagram) तरुणींना लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून नंतर बलात्कार करून फोटो आणि व्हिडीओ काढायचा. त्यानंतर त्याचा वापर करून त्या तरुणींना ब्लॅकमेल करत होता. या तरुणींकडून आरोपीने पैसे आणि दागिणे उकळले होते.

लग्नाच्या बहाण्याने बलात्कार 

पीडितेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता जे समोर आले ते अतिशय धक्कादायक आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर या तरुणीशी मैत्री केली आणि त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार दिला. अशा प्रकारे फसवणुकीचे आणि बलात्काराचे एक नव्हे तर तब्बल तीन गुन्हे आरोपी विरोधात दाखल करण्यात आले आहेत. सध्या मालवणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक करून अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे, मालवणी पोलिसांना याबाबतची तक्रार 27 सप्टेंबर रोजी वर्ग करण्यात आली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित डॉक्टरला अटक केली. पोलीस कस्टडीमध्ये केलेल्या तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. आरोपीची आणि फिर्यादीची ओळखस ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवले. तिच्याकडून पैसे आणि इतर सोन्याचे दागिणे उकळले. 

Mumbai Crime News : आणखी एका महिलेला जाळ्यात ओढलं 

या आरोपीने आणखी एका महिलेला त्याच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं. तिच्याकडूनही पैसे आणि दागिणे घेतले होते. आरोपीवर मालवणी पोलीस ठाण्यात 2020 मध्ये पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. त्यासंबंधित दोषारोप ठेवण्यात आला असून न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. मालवणी पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget