Maharashtra Tuljapur Crime News : घरगुती वादातून एका मामानं चक्क आपल्या भाच्यावरच पिस्तुलमधून गोळी झाडल्याची घटना घडली आहे. मामानं गोळी झाडताच भाच्यानं डावा हातमध्ये घेतल्यानं कोपराच्या खालच्या बाजूला गोळी लागली आहे. या घटनेत 13 वर्षीय सार्थक महादेव मस्क गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


घरगुती भांडणातून वाद विकोपाला गेला आणि ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घरात भांडणं झाली आणि वादामध्ये वडिलांचीच बाजू घेतल्याच्या कारणावरून मामानं भाच्यावर गोळी झाडली. तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. काल (शनिवारी) या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भाग्यवान गायकवाड यांनी शुक्रवारी बारूळ येथे जाऊन 'आमच्या बहिणीला का त्रास देता', अशा शब्दांत सासरच्या मंडळींना जाब विचारला. त्यावेळी वादात सार्थक महादेव मस्के हा आपल्या वडिलांची बाजू घेत होता. त्यामुळे संतापलेल्या मामानं आपल्याजवळील पिस्तुल काढलं आणि भाच्यावर गोळी झाडली. 


वडिलांचीच बाजू घेत असल्यानं संतप्त होऊन आरोपी भाग्यवान गायकवाड यानं 13 वर्षीय भाचा सार्थक महादेव मस्क याच्यावर सोबत आणलेल्या पिस्तुलमधून गोळी झाडली. यावेळी सार्थकनं आपला डावा हात वर केल्यानं कोपराच्या खालच्या बाजूस पिस्तुलची गोळी लागली. यात गंभीर जखमी अवस्थेतील सार्थकला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :