Pandharpur Ashadhi Wari 2022 : दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा (Ashadhi Yatra) विक्रमी होण्याचे अंदाज असताना पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल 40 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर पालखी (Alanadi Pandharpur Palkhi)मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे , प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , विश्वस्त अभय टिळक , बाळासाहेब चोपदार ,  आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली. 


जेजुरीचा पालखी तळ बदलला
यंदा जेजुरीला नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर होत असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीची जागाही रस्त्याच्या कामात गेल्याने या जागेबाबत पर्यायांची माहिती घेतली. एकंदर पालखी मार्गावर यंदा वारकऱ्यांसाठी चार पदरी रास्ता बनल्याने भाविकांची चांगली सोय झाली असून मार्गात येणाऱ्या किरकोळ अडचणी प्रशासनाला सांगण्यात आल्याचे ढगे यांनी सांगितले. 


माऊलीच्या पालखीसोबत 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी


मुक्काम तळ , रिंगणाच्या जागेवर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.  रस्त्याच्या कामामुळे शेकडो झाडे कापली गेल्याने वारकऱ्यांना दुपारी भोजनाच्या वेळी सावलीसाठी ग्रीन नेट बांधण्याची विनंती करणार असल्याचे ढगे यांनी सांगितले . याशिवाय यंदा माऊलीच्या पालखीसोबत 6 लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार असल्याने पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्यव्यवस्था करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली. सोहळ्याच्या प्रस्थानाला एक महिन्याचा वेळ असल्याने उरलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली आहे. 


10 जुलैला आषाढी एकादशी आहे. या आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे.  या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ashadhi Wari : यंदा पालखी सोहळ्यात विकासाचे प्रकल्प अडसर ठरण्याची शक्यता! परंपरा पाळणारा वारकरी संप्रदाय बदल


Ashadhi Wari : वारीची तयारी! 15 लाख वारकरी वारीत सहभागी होण्याचा अंदाज, पालकमंत्र्यांची माहिती


Pandharpur Wari 2022 : आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल मंदिरात होणार हे बदल; मंदिर समितीच्या बैठकीत मोठे निर्णय