एक्स्प्लोर

धक्कादायक, बीडमध्ये नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात 400 वेळा अत्याचार

बीडमधील (Beed) अंबाजोगाई येथे एका अल्पवयीन मुलीवर गेले सहा महिन्यात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

बीड : बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गेले सहा महिन्यात अनेकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

या मुलीचं न कळत्या वयात लग्न झालं होतं मात्र सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं घर सोडलं. मात्र तिचे हाल तिथे संपले नाहीत. बेघर असलेल्या या मुलीवर गेल्या सहा  महिन्यांपासून अत्याचार सुरू होते. अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आणि मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये मागच्या सहा महिन्यापासून एका बेघर झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार चालू होता.  अखेर एका महिलेने रस्त्यावर फिरणाऱ्या या मुलीला जवळ बोलावले आणि हे दाहक वास्तव समोर आलं.

घरातून बाहेर पडल्यानंतर ही पीडित मुलगी अंबाजोगाईच्या रस्त्यावर भीक मागत फिरू लागली.  तिचा फायदा घेऊन अनेकांनी  तिच्यावर वारंवार अत्याचार करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने आपल्या जबाबात सांगितल आहे.  या मुलीवर अत्याचार करणाऱ्या चार जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलय

पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मागच्या सहा महिन्यात चारशे पेक्षा जास्त वेळा या मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती बालकल्याण समितीने दिली आहे. ही पीडित मुलगी आता बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही मुलगी काही महिन्याची गर्भवती असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिचा गर्भपात करण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget