Latur Crime News: लातूर जिल्ह्यात (Latur District) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, या घटनेने जिल्हा हादरला आहे. शहरातील महिला आणि बालविकास विभागाच्या एका निरीक्षण बालगृहातील अल्पवयीन मुलीला (Minor Girl) (वय 16 वर्षीय) गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार (Latur Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या मैत्रिणीसह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका महिलेला अटक देखील करण्यात आली आहे. 


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षण बालगृहातील एक मुलगी एका महविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, तिची आठवीपासूनची एक मैत्रीण तिच्याच सोबत शिक्षण घेत आहे. दरम्यान, बुधवारी 18 जानेवारीला या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी पीडीत मुलीच्या मैत्रिणीच्या आणखी दोन मैत्रिणी तिथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पार्टी करू म्हणून या दोघींना सोबत चालण्याची विनंती केली. त्यामुळे पीडीत मुलगी आणि तिची मैत्रीण त्या मैत्रिणीसोबत जाण्यास तयार झाल्या. 


बाजूला नेऊन बळजबरीने केला अत्याचार 


पार्टीला जाण्याचं ठरल्यावर आलेल्या मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर मैत्रिणीचा पती तिथे ऑटोरिक्षा घेऊन आला. रिक्षाचालकासह पाच जण अंबाजोगाई मार्गावरील एका ज्वारीच्या शेतात गेले. तिथे सर्वजण रिंगण करून बसले. यावेळी मैत्रिणीच्या नवऱ्याने एक बाटली काढून पित बसला. दरम्यान याचवेळी रिक्षाचालकाने एका बाटलीतील गुंगीचे औषध बालगृहातील मुलीला जबरदस्तीने पाजले. त्यानंतर रिक्षाचालकाने मुलीला बाजूला नेऊन अत्याचार करायला सुरवात केली. विरोध केल्यानंतर त्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली. यातच मुलीला गुंगी आली. जाग आली तेव्हा ती बालगृहात होती. 


पोलिसांत गुन्हा दाखल! 


बालगृहात आलेल्या पीडीत मुलीला शुद्ध आल्यावर तिला याबाबत विचारणा केली असता, तिने या घडलेल्या घटनेची माहिती बालगृह प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर तीनपैकी एका मैत्रिणीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर लातूर जिल्हा या घटनेने हादरलं आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Urea Stock Seized : भिवंडीत 18 लाख रुपयांचा 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त, तपासणीनंतर कारवाई होणार