Dhirendra Krishna Shastri Bageshwar : बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांची रामकथा सध्या छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूरमध्ये (Raipur) सुरु आहे. रायपूरमध्ये आयोजित दरबारमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी अचानक रडू कोसळलं. दरबारात धीरेंद्र शास्त्रींचे डोळे पाणावलेले दिसले. पण नक्की असं काय झालं की, भर दरबारात धीरेंद्र शास्त्रींना रडू कोसळलं. जाणून घ्या यामागचं कारण...


बागेश्वर महाराजांना अचानक कोसळलं रडू


धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या दैवी दरबारात भक्तांकडून त्यांच्या समस्या निवारणासाठी अर्ज केले जातात, त्यानंतर त्यांचा दरबारात नंबर लागतो. पण शुक्रवारी शास्त्रींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर दिव्य दरबारचे आयोजन केले. आपल्यावर सातत्याने देशात अंधश्रद्धा पसरवल्या जात असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शास्त्रींनी शुक्रवारच्या दरबारात एक-एक करून भाविकांचे अर्ज घेतले. याशिवाय आपल्याकडे सनातन शक्ती आहेत, हे सिद्ध करण्यासाठी प्रसारमाध्यमांनाही मंचावर बोलावण्यात आले. गर्दीतून कोणालाही घेऊन या, त्यांची समस्या तात्काळ सांगीन, असं चॅलेन्जही शास्त्रींनी केलं.


दिव्य शक्ती असल्याचा धीरेंद्र शास्त्रींचा दावा


धीरेंद्र शास्त्री हे उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवतात. भक्त सांगण्याआधीच त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहितात आणि त्या समस्येवर उपायही सांगतात, असा दावा करतात. त्यानंतर ते भक्तांना त्यांची समस्या विचारतात. ही समस्या आणि शास्त्रींनी लिहिलेली समस्या एकच असते. त्यामुळे आपल्याकडे दिव्य शक्ती आहे. यामुळे आपल्याला भक्त सांगण्याआधीच त्यांच्या समस्या कळतात, असा बागेश्वर महाराजांचा दावा आहे.


गर्दीतून एका व्यक्तीची निवड केली


बागेश्वर महाराजांनी आदेश देताच, शिष्यांनी उपस्थित भक्तांमधील एका महिलेची निवड केली. ही महिला तिच्या आजारी मुलाला घेऊन बिलासपूरहून आली होती. दोघांना मंचाकडे पाठवण्यात आलं. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महिलेला विचारलं की, तुम्ही बागेश्वर धाम समितीमध्ये कोणाला तुमच्या समस्येबद्दल सांगितले आहे का? महिलेने नाही सांगितले. यानंतर बागेश्वर महाराजांनी आधीच लिहिलेला अर्ज वाचून दाखवला. यामध्ये महिलेच्या दिव्यांग मुलाबाबत महाराजांनी अर्जात आधीच लिहिलेलं होतं की, महिलेचा मुलगा आजारी आहे. त्याला नीट चालता येत नाही. मज्जातंतूचा आजार असून कुंटुंबात पैशांची समस्या आहे, त्यामुळे त्याच्या उपचारात अनेक अडचणी येत आहेत. त्यानंतर महिलेच्या सर्व अडचणी दूर होतील, असा आशीर्वाद महाराजांनी दिला. 


बागेश्वर महाराजांना अचानक का कोसळलं रडू?


दिव्य दरबारात धीरेंद्र कृष्ण शास्त्री एक-एक करून भाविकांच्या समस्यांचे अर्ज काढत होते. पण त्यांचे डोळे पाणावलेले होते. एबीपी न्यूजने त्यांचे शिष्य बालरुण शर्मा यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सनातन धर्माला आज परीक्षा द्यावी लागत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री दैवी दरबारात बसत नाहीत, तर स्वतः हनुमान येथे बसले आहेत. आज त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे. आज परीक्षा द्यावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. भक्ताला गुरूची वेदना जाणवते. त्यांचे दु:ख आम्हाला जाणवते, अशी प्रतिक्रिया महाराजांच्या भक्ताने दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?