Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाची (Jalgaon Dudh Sangh) नोकर भरती (Recruitment of Employees) रद्द केल्याची घोषणा भाजपचे (BJP) आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार एकनाख खडसे (MLA Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. एकीकडे बेरोजगारी (Unemployment), बेकारी वाढत आहे. जे लोक आज नोकरीवर आहेत, त्यांनाच कमी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे राजकीय हेतूपोटी असल्याचे खडसे म्हणाले. या निर्णयामुळं 100 ते सव्वाशे कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
Ncp Eknath Khadse on MLA Mangesh Chavan : 90 टक्के लोकांना कायम करण्याचा प्रयत्न होता
जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नुकतीच निवडणूक पार पडली आहे. यामध्ये भाजप (Bharatiya Janata Party) आणि शिंदे गटाने (Shinde Group) एकनाथ खडसे गटाचा पराभव करत दूध संघावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची दुध संघाचे अध्यक्ष म्हणून वर्णी लागली होती. त्यांनी आता जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द केल्याची घोषणा केली आहे. याच मुद्यावरुन एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण आमने सामने आले आहेत. खडसेंनी या निर्णयावर टीका केली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. 90 टक्के लोक पाच ते सहा वर्षांपासून दूध संघ नोकरी करत आहेत. त्या लोकांना कायम करण्याचा आमचा प्रयत्न होता असे खडसे म्हणाले.
Ncp Eknath Khadse : काही ठोस निर्णय घेऊन दाखवा
जिल्हा दूध संघावर पाच महिन्यापासून फक्त आरडा ओरड सुरु आहे. तुम्ही काही ठोस निर्णय घेऊन जनतेपुढे मांडून दाखवा असे एकनाथ खडसे म्हणाले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीनंतर खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन नवनिर्वाचित जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर नाव न घेता टीका केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या: