Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड शहरातील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत आक्षेपार्ह गाणे वाजविल्याने आणि घोषणा दिल्याने वाद झाल्याचं समोर आले आहे. तर या वादात हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच हॉटेलवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार 20 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून, आता या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात 64 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड शहरातील हॉटेल कस्तुरी प्लाझा बिअर बार परमिट रूममध्ये 20 मे रोजी रात्री 8.30 वाजता सुनील नामक व्यक्ती आणि त्याचे मित्र असे काही ग्राहक आले, आम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे, असे सांगून त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. दरम्यान, पार्टी करताना त्यांनी टेरेसवर साऊंड सिस्टीम लावून काही आक्षेपार्ह गाणे वाजवून घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित दुसऱ्या गटाने हे गाणे बंद करण्यास भाग पाडले. यावरून वादावादी झाली. त्यानंतर येथे मोठा जमाव जमला. त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हॉटेलवर दगडफेक करण्यात आली. काहींनी हॉटेलमध्ये येऊन तोडफोड केली. तसेच येथील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी हॉटेल मालक खिरडकर यांच्या गळ्यातील चांदीची 5 तोळ्यांची चैन भांडणात कुठे तरी पडली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


तर सिल्लोड शहरातील एका हॉटेलमध्ये वाद झाला असून, मोठा जमाव जमल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे आदी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जमाव पांगवला. याबाबत हॉटेल चालक नामदेव खिराडकर यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 50 ते 60 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाढदिवस साजरा करणाऱ्या चौघांवरही गुन्हा दाखल 


दरम्यान, याचवेळी हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या चौघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करताना आक्षेपार्ह घोषणा देऊन दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात सुनील कैलास वडगावकर, संदीप जनार्दन पिसाळ, विजय अण्णा जंजाळ, आकाश प्रकाश माने या चार जणांविरुद्ध पोलीस अंमलदार रामानंद बुधवंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mock Drill : 'संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट अन् धावपळ, थेट एनएसजी कमांडो दाखल'; मॉकड्रिल असल्याचे समजताच सुटकेचा निःश्वास