एक्स्प्लोर

Latur : हॉस्टेलच्या वादातून तरुणांमध्ये हाणामारी, लातुरात 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

Latur Hostel Youth Murder : ही घटना घडताच आरोपी तरुण फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

लातूर : शहरात खळबळजनक घटना घडली असून विक्रम पांचाळ (वय 21) या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉस्टेलमधील वादामुळे तरुणांच्या दोन गटात वाद झाला आणि त्यातून या तरुणाची हत्या झाल्याची माहिती आहे. 

लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असून तो हॉस्टेलवर राहत होता. तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी तरुण घटना घडताच फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे औसा रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लातूर पोलीस हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत असून पुढील तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Akola Crime: धक्कादायक! अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाचा डॉक्टरांवर हल्ला; महिला डॉक्टरलाही मारहाण; संतप्त इंटर्न डॉक्टरांचा काम बंदचा इशारा
धक्कादायक! अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाचा डॉक्टरांवर हल्ला; महिला डॉक्टरलाही मारहाण; संतप्त इंटर्न डॉक्टरांचा काम बंदचा इशारा
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Sunil Tatkare: डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
Nagpur Air Fest 2026 Air Show : नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Embed widget