Maharashtra Kolhapur Crime News : कोल्हापूरमधील (Kolhapur News) धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. मालमत्तेच्या वादातून (Property Disputes) मलानं वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वडील शौचालयास गेल्यानंतर बाहेरुन रॉकेल टाकून पेटवलं. या घटनेत वडील जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोल्हापूर कागलच्या (Kagal) व्हन्नूरमध्ये (Vannur) ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 


कोल्हापूरमधील कागलच्या व्हन्नूरमध्ये देवबा हजारे हे गृहस्थ आपला मुलगा शिवाजी आणि सून सरला यांच्यासह राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद सुरु होता. कालांतरानं हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या मुलानं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं. सकाळी देवबा हजारे शैचालयाच शौचासाठी गेले होते. त्याचवेळी पाळत ठेवून असलेला मुलगा आणि सूनेनं संधी साधली. दोघांनी बाहेरुन शौचालयाच्या दरवाजाला कडी लावली आणि रॉकेल टाकून शौचालय पेटवून दिलं. त्यावेळी देवबा शौचालयातच होते. देवबा हजारे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, या प्रकरणी कागल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपत्तीसाठी वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा मुलगा आणि सून या दोघांविरोधात कागल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत देवबा हजारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटच्या मुलानंच वडिलांना जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटनेमुळं गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory Result : 'गोडसाखर' हसन मुश्रीफांचे तोंड गोड करण्याची चिन्हे; गोकुळनंतर कारखान्यातही आमदार राजेश पाटलांना धक्का?