Justice DY Chandrachud Will Take Oath : न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) हे आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.


ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांचा भाग 
ते सध्याचे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची जागा घेतील, ज्यांनी 11 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 13 मे 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. यामध्ये अयोध्या वाद, IPC च्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांचा समावेश आहे. 


वडिलांचा कार्यकाळ सर्वात मोठा 


न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला असून त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील CJI चा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत ते सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात BA ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून LLM आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.


 


 






याबाबत माहिती देताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सांगितलं होतं की, "भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे." किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू