एक्स्प्लोर

Kolhapur Crime : मानोली धरण परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळला

कोल्हापुरातील मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह सापडला. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 अशी शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात पत्र्याच्या पेटीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (20 मार्च) दुपारी ही घटना उघडकीस आली.

पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या धरणाच्या मागील बाजूला रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर बेवारस स्थितीत पडलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असावं, अशी शक्यता आहे. तसंच सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयिताने महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून मानोली लघु पाटबंघारे जलाशयाच्या परिसरात टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पत्र्याच्या पेटीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि तिथली पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

दरम्यान ही महिला कोण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याने मृतदेह फारसा चांगल्या परिस्थितीत नाही. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बेपत्ता असणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी तसंच घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हे ही वाचा

Kolhapur: तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितला म्हणून केली हत्या, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Kolhapur Crime : भाच्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मामाचा बेदम मारहाणीत मृत्यू

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Pradeep Purnekar and Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
प्रदीप पूर्णेकर मृत्यूप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, मुलाने राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला, म्हणाला...
Nagpur Fake Currency News: नागपुरतील बनावट नोटांच्या कथित प्रकरणात नवी माहिती समोर; स्थानिकांचा खळबळजनक दावा, पुष्पम बंडाने मात्र अद्याप फरारच
नागपुरतील बनावट नोटांच्या कथित प्रकरणात नवी माहिती समोर; स्थानिकांचा खळबळजनक दावा, पुष्पम बंडाने मात्र अद्याप फरारच

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget