एक्स्प्लोर

Kolhapur: तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितला म्हणून केली हत्या, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Kolhapur: कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून वाद सुरू झाला.

Kolhapur: कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या वादात चाकूने भोकसून एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अनिल रामचंद्र बारड असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास कुंभार यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार हे दोघे एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तंबाखूला चुना मगितल्याच्या कारणावर आरोपी विकास कुंभार आणि जितेंद्र यांच्यात वाद झाला. हा वाद खूप विकोपाला गेला. वादानंतर आरोपी विकास याने जितेंद्र याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. 

विकास कुंभार याने दिलेल्या धमकीनंतर जितेंद्र खामकर याने आपला मामा अनिल रामचंद्र बारड यांना घेऊन जाब विचारण्यासाठी गेला. हा जाब कुंभारवाडी इथल्या चौकात विचारण्यात आला. यावेळी वाद मिटण्याऐवजी वाद आणखी वाढला. आरोपी विकास हा आणखीनच आक्रमक झाला. विकास याने जितेंद्र आणि अनिल या मामा भाच्याला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि स्वतःच्या मोटारसायकलवर असलेला चाकू हातात घेतला.आक्रमक झालेल्या विकासाने हा चाकू मामा अनिल याच्या पाठीत उजव्या बाजूला खुपसला. सलग दोन वेळा विकास याने चाकू अनिल यांच्या पाठीत खुपसला. त्यामुळे अनिल रामचंद्र बाराड हे जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी अनिल यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Embed widget