एक्स्प्लोर

Ketan Agarwal Death Case: केतन पडताना आपल्याला पकडू नये म्हणून सियाने काय केलं?, केतनच्या मृत्यू प्रकरणात चक्रावून टाकणारी माहिती समोर, तो खाली पडल्यानंतर 15 मिनिटं सियाचा 'फोन ड्रामा'

Ketan Agarwal Death Case: हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती.

पुणे: पुण्यातील तरूण व्यवसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयासमोर आणि तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या दाव्यानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर (Ketan Agarwal Death Case) घडलेला हा प्रकार अपघाती नसून अत्यंत थंड डोक्याने रचलेला कट (Ketan Agarwal Death Case) होता. केतनचा बळी घेताना मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी प्रत्येक हालचाल आधीच ठरवली होती. या प्रकरणात आता सियाच्या मैत्रिणींसह मित्तल कुटुंबातील सदस्यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले असून तपासाची व्याप्ती वाढली आहे.(Ketan Agarwal Death Case)

Ketan Agarwal Death Case:  पाणी पिण्याचा बनाव अन् चेतनला इशारा; लुल्लानगरच्या कॅफेमध्ये रचला होता कट

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. इतकेच नव्हे तर, यापूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड केली होती आणि तिथे गुन्ह्याचा सराव (रिहर्सल) देखील केला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.

१८ जूनला लोहगडावर पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. सिया खाली बसण्यामागे पोलिसांच्या मते एक अत्यंत क्रूर कारण होते; केतन दरीत कोसळत असताना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये, म्हणूनच ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले. याबाबतची माहिती एका मराठी वृत्तसंस्थेने दिली आहे.

Ketan Agarwal Death Case:  टोलची नोंद टाळण्यासाठी ९० किमी दुचाकीचा प्रवास; 'हुडी' बदलून केला वेषांतर

आरोपी चेतन चौधरीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली होती. तो पुणे ते लोहगड हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून पार करून आला होता. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपल्या कारची नोंद होऊ नये, म्हणून त्याने चारचाकी वाहनाचा वापर टाळला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ती दुचाकी जप्त केली आहे. तसेच, किल्ल्यावर चढताना चेतनने ओळख लपवण्यासाठी 'हुडी' घातली होती, मात्र वर पोहोचल्यावर तो केवळ काळ्या टी-शर्टमध्ये राहिला. हत्येनंतर पळून जाताना त्याने पुन्हा हुडी घातली आणि त्याच स्कूटरने तो पुण्यात फरार झाला.

Ketan Agarwal Death Case:  हत्येनंतर लोकल मदतीऐवजी आईला फोन; १५ मिनिटांचा 'कॉल ड्रामा'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने केतनला कड्यावरून खाली ढकलल्यानंतर सिया गोयलने तातडीने कोणताही आरडाओरडा केला नाही. ती जवळपास दोन मिनिटे पूर्णपणे शांत उभी होती. चेतन तिथून सुरक्षितपणे निसटला आहे की नाही आणि आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना, याची ती खात्री करत होती. केतन दरीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक किंवा पोलिसांची मदत मागण्याऐवजी सियाने सर्वात आधी आपल्या आईला फोन केला आणि 'केतन किल्ल्यावरून खाली पडला' अशी माहिती दिली. पुढील १५ मिनिटे ती केवळ नातेवाईकांशी फोनवर बोलत राहिली. तिच्या या वर्तनामुळे केतनला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्यातच त्याचा अंत झाला.

Ketan Agarwal Death Case:   मैत्रिणी आणि मित्तल कुटुंब पोलिसांच्या रडारवर!

पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) आता या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. सिया गोयल हिच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिया तिच्या मैत्रिणींसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत असे, त्यामुळे या मैत्रिणींच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Ketan Agarwal Death Case:  "पोलीस कोठडीतील कबुली ग्राह्य धरू नका"; सियाच्या वकिलांचा युक्तिवाद

दुसरीकडे, कायदेशीर आघाडीवर सिया गोयलचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी पोलिसांच्या दाव्यांना आव्हान दिले आहे. "पोलीस कोठडीत आरोपीने दिलेल्या जबाबाचा न्यायालयात पुरावा म्हणून विचार केला जात नाही," असे वकिलांनी स्पष्ट केले. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेला अपघात का मानले आणि नंतर अचानक खुनाचा गुन्हा कसा दाखल झाला? हा महत्त्वाचा प्रश्न आपण न्यायालयात उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना चौकशीसाठी पुरेसा वेळ मिळाला असून आता सियाला आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget