Gold Rate Today In India, 24 January 2024 : पुढील महिन्यात लग्नाचा हंगाम सुरु होणार असल्याने बाजारात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. मागील वर्ष सरताना सोन्याच्या दराने (Gold Rate) उच्चांक गाठला, त्यानंतर आता मात्र, सोन्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.


मल्टी कमोडिटी एक्सचेंज


मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर मंगळवारी सोन्याच्या फ्युचर्सची 62,158 रुपयांनी खरेदी-विक्री होत होती. तर चांदीचे फ्युचर्स 71,098 रुपयांवर व्यवहार करत होते. सोन्याच्या जागतिक किंमती, रुपयाचे मूल्य आणि सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनातील श्रम आणि साहित्याशी संबंधित खर्च यासह विविध घटकांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. भारतामध्ये सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व, गुंतवणुकीचे मूल्य आणि विवाहसोहळा आणि सणांमध्ये त्याची पारंपारिक भूमिका यामुळे सोने खरेदीला महत्त्व आहे.


सोने आणि चांदी दरवाढीतून दिलासा


सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरवाढीतून दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत सलग तिसऱ्या दिवशी कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 


मुंबईत सोन्याचा दर काय?


गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार, आज 24 जानेवारीला, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीचा भावही काय आहे. चांदीचा दर 75,000 रुपये प्रति किलो आहे.


चांदीच्या दरात घसरण


आज सोन्याच्या दरात घट झाली नसली तरी चांदीच्या दरातही दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दरात 500 रुपयांची घट झाली आहे. बुधवारी, चांदीचा भाव 75,000 रुपये प्रति किलो आहे.


आज सोन्याचा दर काय?


नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,000 रुपये प्रति किलो आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,000 रुपये प्रति किलो आहे. बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 73,000 रुपये प्रति किलो आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gold Rate Today : सोन्याचा दर 70000 पार पोहोचणार, जागतिक बाजारात सोन्याचे फ्युचर्स वाढले; आज सोने-चांदीचा भाव काय?