एक्स्प्लोर

400 रुपयांच्या वादातून मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

400 रुपयांच्या वादातून मित्रांमध्ये हाणामारी झाली असून यामध्ये एका मित्राचा विजेच्या खांबावर आदळून मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे.

कल्याण : दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचे डोकं विजेच्या खांबावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगर परिसरात घडली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच भागांतील साईनाथ कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर शेजारी आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा संपूर्ण थरार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. फहिम शेख असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात फहिमच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत सोनू गुप्ता या आरोपीला याला अटक करण्यात आली आहे.

फहिम आणि सोनू हे दोघे एकाच जीन्स कंपनीत काम करत होते. फहिम याने सोनूकडून 400 रुपये उसने घेतले होते. काही दिवस झाले आपले पैसे परत न केल्यामुळे सोनूने फहिमकडे पैसे मागण्याचं ठरवलं. सोनूने आज सकाळी फहिमकडे उसने घेतलेले पैसे परत मागितले. सोनूने पैसे मागितल्यामुळे फहिमला राग आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

हाणामारीत सोनूने फहिमला धक्का दिला. सोनूने ढकलल्यामुळे फहिम मागे असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला. फहिमला डोक्याला गंभीर दुखापत झाली. विजेच्या खांबावर जाऊन आदळल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीत फहिमचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीत झालेल्या दुखापतीमुळे फहिमचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टम केल्यानंतरच मृत्यूच कारण स्पष्ट होईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सोनू आणि फहिमचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असलेला त्यांच्या मित्रांसमोरचा हा प्रकार घडला. यावेळी फहिमचा भाऊही तिथे उपस्थित होता. फहिमच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यानंतर पोलिसांनी सोनूला अटक केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget