एक्स्प्लोर

विनयभंगाच्या मानसिक धक्क्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, कल्याणमधील घटना 

Crime News : तरुणीवर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime News Today : एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने विनयभंग केल्याने मानसिक तणावात गेलेल्या पीडित तरुणीने थायमाईट हे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण जवळील कुंभारपाडा गावात घडली आहे. या तरुणीवर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कल्याणजवळ कुंभारपाडा गावातील एक 50 वर्षाची महिला आपल्या दोन मुलींसह राहते. तिचे पती काही वर्षापूर्वी मरण पावले आहेत. ही महिला मोलमजुरी करुन आपला व मुलीचा उदरनिर्वाह करते.  दिवाळी सणाच्या काळात पणत्यांना मागणी असते. या महिलेने मातीच्या पणत्या तयार केल्या होत्या. या पणत्या विक्रीसाठी ती शेजारच्या आपटी गावात गेली होती. घरी या महिलेची 21 वर्षाची मुलगी एकटीच होती. शेजारी काकांचा मुलाशी तरुणीसोबत गप्पा मारत बसला होता. तरुणीने आता दुपारची वेळ झाली आहे. तू घरी जा. मी थोडा वेळ घरात आराम करते असे सांगितले.   घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत काकाच्या मुलगा  पुन्हा तरुणीच्या घरी आला. तरुणीच्या खोलीत आराम करत होती. त्या खोलीत जाऊन त्याने तरुण बरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तात्काळ त्याला दूर लोटले. घाबरुन जाऊन तरुणी शेजारी असलेल्या काकाच्या घरी गेली. त्यानंतर काकाचा मुलगा तरुणीच्या घरीच होता. संध्याकाळी आई घरी आल्यावर तरुणीने आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. मुलगी आणि आई दोघेही नातेवाईकांच्या घरी जाऊन तुमचा मुलाने  विनयभंग केला असल्याचे सांगितले. मात्र नातेवाईकानी 
 प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोघीही घरी परतल्या. आईने आपल्या मुलींना हा प्रकार सांगितला. रविवारी सकाळी तरुणीची आई, तिची दुसरी मुलगी घरात काम करत असताना त्यांना आपली मोठी मुलगी अजून का उठत नाही म्हणून ती तिच्या खोली गेली. तेव्हा तिला मुलीच्या तोंडाला उग्र विषारी वास येत असल्याचे दिसले. तिने मुलीला काय झाले विचारले. तिने आपण थायमाईट विषारी द्रव्य प्यायले असल्याचे सांगितले. 

आईने तात्काळ गावातील एका खासगी वाहनाने मुलीला टिटवाळ्यातील महागणपती रुग्णालयात नेले. तेथून तिला कल्याण मधील श्वास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

आणखी वाचा :
संतापजनक! सतरा वर्षीय मूकबधिर मुलीवर गावातील व्यक्तीकडूनच लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget