मुंबई : काळाचौकी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जे जे रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरिफ मेहबूब कुरेशी असे या आरोपीचे नाव असून त्याला आर्थररोड कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी ठेवले होते. फिटचा त्रास झाल्याने आरोपीला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आरिफ कुरेशीला काळाचौकी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने आरिफला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरिफला 22 सप्टेंबररोजी आर्थररोड कारागृहात आणलं होतं. मात्र आरिफला फिटचा त्रास झाल्याने त्याला 22 सप्टेंबर रोजीच जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिस तपासात आरोपी आरिफ हा अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
ही बातमी वाचा :