Hollywood Sign : जगातील सर्वात महागडी आणि हटके चित्रपटसृष्टी म्हणजे हॉलीवुड (Hollywood). हॉलीवुडची चित्रनगरी कॅलिफोर्नीयाच्या लॉस एन्जेलस (los angeles) येथे असून याठिकाणचा भव्य असा हॉलीवुडचा बोर्ड (Hollywood Sign) जगभरात प्रसिद्ध आहे. पण हाच बोर्ड आता रॅम्सहाऊस (RamsHouse) असा दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे सुपर बाऊल गेम या स्पर्धेत लॉस एन्जेलसचा रॅम्स (Rams) संघ जिंकला आहे. याच्याच आनंदात या बोर्डवर 'RAMSHOUSE' अशी अक्षरं चिटकवून रॅम्स हाऊस असं करण्यात आलं आहे.


लॉस एन्जेलस शहराच्या माउंट लीच्या माथ्यावर हॉलीवुड (HOLLYWOOD) असं लिहिलेला तब्बल 50-फूट-उंचीची (15.2 मी) हा साईनबोर्ड 1923 साली लावण्यात आला आहे. आता जवळपास 100 वर्ष या बोर्डला होत आली आहे. दरम्यान सोमवारी (14 फेब्रुवारी) सुपर बॉऊल (Super Bowl) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लॉस एन्जेलस रॅम्सने सीनसीनाटी बेंगल्सला (Los Angeles vs Cincinati Bengals) मात दिली. ज्यानंतर फॅन्सनी आनंदी होत थेट हॉलीवुडचा साईन बोर्ड रॅम्सहाऊस असा केला. RAMSHOUSE ही आठ पांढरी अक्षर वापरुन झाकण्यात आला आहे. दरम्यान या कामासाठी सोमवारपासून काम सुरु होते. ज्यानंतर बुधवारी (16 फेब्रुवारी) काम पूर्ण झाल्यानंतर विजयी मिरवणूकीदरम्यान चाहत्यांनी जल्लोष केला. ट्वीटरवर या सर्वानंतर विविध पोस्टही शेअर होत आहेत. दरम्यान हा बदल काही काळासाठीच असून या आठवड्यातच साईन बोर्ड पूर्वीप्रमाणे होणार आहे.




हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha