जळगाव : जिल्ह्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून (Varangaon Ordnance Factory) 5 अत्याधुनिक रायफल्स चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जळगावात (Jalgaon News) एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून देशाच्या लष्करासाठी एके 47 रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर सिमेवर पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच एके 47 या रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
पाच रायफलींची चोरी
अज्ञात व्यक्तीने तीन एके-47 रायफल आणि दोन 5.56 गॅलील एस रायफल अशा पाच रायफल चोरल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात तपासणी केली. मात्र गहाळ झालेल्या पाच रायफली आढळल्या नाहीत. यानंतर अधिकाऱ्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या