Pushpa 2 Release Date : सुपरस्टार अल्लू अर्जूनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2 चा टीझर समोर आला आहे. पुष्पा 2 : द रुल चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतही मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2021 मध्ये आलेल्या पुष्पा : द राईज चित्रपटाने धमाका केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासूनच प्रेक्षक पुष्पा चित्रपटाच्या सीक्वेलकडे डोळे लावून बसले आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून नवीन रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट प्री-पोन करण्यात आला आहे, म्हणजे चित्रपट आधी प्रदर्शित होणार आहे.
पुष्पा 2 चा दमदार टीझर
जर तुम्हाला साऊथ चित्रपटांचे शौकीन असेल तर या वर्षाचा शेवट तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. पुष्पा 2 चित्रपट आता एक दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2 ची रिलीज डेट निश्चित झाली आहे. चित्रपटाचं नवीन पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे.
रिलीजच्या आधीच पुष्पा 2 ची कोट्यवधींची कमाई
पुषा 2 या चित्रपटाचं शूटिंग सध्या वेगाने सुरू आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. पुष्पा 2 चित्रपटाने 1085 कोटींचे एकूण प्री-रिलीझ कलेक्शन केलं आहे. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली उत्तम सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी चाहते सज्ज आहेत. चित्रपटाच्या संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीजपूर्वीच्या कलेक्शनचे आकडे पाहता, चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करण्याची शक्यता आहे.
'या' दिवशी रिलीज होणार पुष्पा 2 चित्रपट
हैदराबादमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली. पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार होता, मात्र आता पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :