मुंबई : दत्तक प्रक्रिया न करता बेकायदेशीरपणे मुल विकणाऱ्या दोन महिलांचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. या दोन महिलांचं स्टिंग ऑपरेशन करत मुंबई गुन्हे शाखेच्या बालकल्याण समिती आणि जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाराच्या मदतीनं 15 दिवसांच्या चिमुरडीची सुटका केली आहे. तपासादरम्यान आरोपीने पालकांकडून साडेचार लाख रुपयांची मागणी केल्याचं पोलिसांना आढळून आले. 


 ज्युलिया फर्नांडिस आणि तिची केअर टेकर शबाना शेख हे अँटोफिल येथील अहाना नर्सिंग होममधून हे रॅकेट चालवत होते. तर नर्सिंग होम कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. दत्तक प्रक्रियेचा अवलंब न करता बेकायदेशीरपणे मूल विकणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेण्यासाठी पथकाने स्टिंग ऑपरेशन करून रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान आरोपीने पालकांकडून 4.50 लाख रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांना आढळून आले. जन्म प्रमाणपत्र प्रक्रियेसह कागदपत्रांचे पालन करण्यासाठी  50,000 रुपये आणि पालकांना चार लाख रुपये देण्याचा दावा केला होता.


पोलिसांनी सांगितले की, अटक केलेले दोन आरोपी ज्युलिया फर्नांडिस आणि तिची केअर टेकर शबाना शेख हे अँटोफिल येथील अहाना नर्सिंग होममधून रॅकेट चालवत होते. नर्सिंग होम कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. पोलिसांना त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर सापडले आणि आत काहीतरी गडबड झाल्याची शंका असून त्याचा तपास सुरू आहे.आरोपींना गुन्ह्यासाठी 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. अवैध तस्करीच्या रॅकेटमागे कार्यरत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. 15 दिवसांच्या मुलीची सुटका करण्यात आली असून तिला सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अद्याप सापडलेल्या मुलीच्या पालकांचा पोलीस शोध घेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: