Hyderabad Rave Party Busted:  हैदराबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४२ जणांना ताब्यात घेतलं आहे. बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या रेव्ह पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्याच व्यक्तिंचाही समावेश आहे. 

Continues below advertisement


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता नागा बाबू यांची कन्या निहारिका कोनिडेला, बिग बॉस तेलुगू रिऍलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचा समावेश आहे. निहारिका कोनिडेला ही मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आहे.  पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोकेन आणि चरस जप्त केलं आहे.


गायक आणि बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचाली ताब्यात घेण्यात आले आहे. राहुलने 12 फेब्रुवारी रोजी हैदराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू केली तेव्हा त्याने थीम सॉंग गायले होते.


त्याशिवाय, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगू देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता आणि इतरांप्रमाणेच चुकीची माहिती पसरवली जात आहे. शहरातील सर्व पब बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.


पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्यासाठी त्यांनी Hyderabad-Narcotics Enforcement Wing ही सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी एसएचओ शिव चंद्रा यांना हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्यांच्या जागी टास्क फोर्सचे के.के. नागेश्वर राव यांनी जबाबदारी देण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha