Beed: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पोलिसांनी हटकले. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी त्या पोलिसाला आणि सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फायटरचाही वापर करण्यात आला. ही घटना अंबाजोगाईच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी उत्तरेश्वर मधुकर केदार यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री ते टपाल घेऊन शासकीय दुचाकीवरून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे निघाले होते. यावेळी उपअधीक्षक कार्यालयासमोर दोघे तरुण गोंधळ घालताना त्यांना दिसले. त्यामुळे केदार यांनी त्यांना हटकले. त्यामुळे संतापलेल्या या दोन तरुण आणि त्यांच्या सोबतच्या आणखी तिघांनी तू पोलीस असला म्हणून काय झालं असं म्हणत केदार यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
भर रस्त्यावर सुरू असलेला हा गोंधळ ऐकून अपर अधीक्षक कार्यालयातून सुरवसे, घुगे आणि इतर कर्मचारी धावून आले. त्यानंतर या सर्व पोलिसांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केल्याने हल्लेखोरांनी पलायन केले असता अनंत विश्वांबर मोरे, गणेश अंकुशराव मोरे हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. तर प्रशांत बालासाहेब मोरे, स्वरूप बालासाहेब मोरे, अतुल बालासाहेब मोरे आणि कारमधून आलेले अनोळखी पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर फिर्यादीवरून दहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस इतर पाच जणांचा शोध घेत आहेत..
इतर महत्वाच्या बातम्या:
Raj Thackeray: जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे
Raj Thackeray : अजित पवार पळून कुणासोबत गेले? लग्न कुणासोबत केले? - राज ठाकरेंचं टीकास्त्र
Raj Thackeray: मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कुठली शिक्षा करणार? राज ठाकरे यांचा मविआ सरकारला सवाल