एक्स्प्लोर

Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य

Hingoli Crime News: कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच कायदा धाब्यावर बसवल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Hingoli Crime News: कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच कायदा धाब्यावर बसवल्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड पोलीस दलात (Nanded Police) कार्यरत असलेल्या प्रशांत गजभारे या पोलीस कर्मचाऱ्याने पहिली पत्नी हयात असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेताच दुसरा विवाह थाटल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर हे लग्न थांबवण्यासाठी गेलेल्या पहिल्या पत्नीला नवरदेवाच्या वेशातील या पोलिसानेच लग्न मांडवात अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Hingoli Crime News: फेसबुकवरील फोटोमुळे फुटले बिंग 

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पोलीस दलातील कर्मचारी प्रशांत गजभारे यांचा 2022 मध्ये शारदा गजभारे यांच्याशी प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता. त्यांना दोन वर्षांची एक चिमुकली मुलगी देखील आहे. संसार सुरू असताना त्यांच्यात कौटुंबिक वाद होत होते. मात्र, हे वाद सुरू असतानाच 5 जुलै रोजी फेसबुकवर (Facebook) आपल्या पतीच्या दुसऱ्या विवाहाचे फोटो पाहून शारदा गजभारे यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Hingoli Crime News: लग्न मंडपातच पत्नीवर हल्ला, गळा दाबण्याचा प्रयत्न

पती दुसऱ्या लग्नाच्या बेतात असल्याचे समजताच शारदा गजभारे या आपल्या नातेवाईकांसह तात्काळ वसमत शहराजवळील 'कृष्ण मंगल कार्यालयात' पोहोचल्या. त्यांनी पतीला दुसरे लग्न का करत आहे? असा जाब विचारत हा विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या, डोक्यावर बाशिंग आणि अंगावर नवरदेवाचा पोशाख असलेल्या प्रशांत गजभारे याने स्वतःच्या पहिल्या पत्नीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

Hingoli Crime News: मुकाट्याने पाहत राहिले वऱ्हाडी

हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या वेशातील पोलीस कर्मचारी महिलेला अमानुषपणे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या शेकडो वऱ्हाडी आणि नातेवाईकांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला, मात्र कोणीही ती मारहाण थांबवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.

Hingoli Crime News: पोलीस कर्मचाऱ्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल

या अमानुष मारहाणीत शारदा गजभारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी हिंगोलीच्या वसमत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पोलीस कर्मचारी प्रशांत गजभारे याच्यासह इतर 12 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हक्कासाठी शारदा या सध्या दोन वर्षांच्या चिमुकलीला कडेवर घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. "मला न्याय मिळावा आणि माझ्या दोन वर्षांच्या लेकीला तिचा बाप मिळावा," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget