एक्स्प्लोर

Goregaon Crime : खेळताना उचलले आणि डक्टमधून खाली ढकलले, गोरेगावात 12 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले

Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात एका इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून शेजारी राहणाऱ्या लहान बाळाला खाली फेकून दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबई : गोरेगाव पूर्व (Goregaon East) परिसरात अंगावर काटा आणणारी आणि मन सुन्न करणारी अत्यंत भीषण घटना घडली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 18 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत मुलीचं नाव अरिबा खान असं आहे. 

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या (Dindoshi Police) हद्दीतील शिवशाही प्रकल्प, इमारत क्रमांक 1 मध्ये बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसडले आहे.

खेळताना उचलले अन् डक्टमधून खाली ढकलले

मिळालेल्या माहितीनुसार, 18 महिन्यांचे बाळ रात्री इमारतीच्या 6 व्या मजल्यावर खेळत होते. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीने बाळाला उचलून थेट इमारतीच्या डक्टमधून (Duct) खाली फेकून दिले. इमारतीतून खाली पडल्याने अत्यंत गंभीर इजा होऊन चिमुकलीचा जागेवरच करुण अंत झाला. हा संपूर्ण थरार इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलगी आणि आई ताब्यात

या घटनेनंतर कृत्य करणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 12 वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील सखोल चौकशी करत आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget