एक्स्प्लोर

धक्कादायक! गोंदियात शिक्षकाचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन, घरी जाऊन दाखवले अश्लील व्हिडीओ

एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले आहे. विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखविले. शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग करण्यात आला आहे.

गोंदिया : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत (Badalapur School Abuse Case)  दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना गोंदियामध्ये (Gondia News)  तशीच एक घटना घडल्याचं समोर आली आहे. गोंदियाच्या डाकराम सुकळी येथील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले आहे. विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखविले. शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग करण्यात आला आहे.  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गात संताप व्यक्त होत असून शाळा व्यवस्थापनावरही ताशेरे ओढले जात आहेत. या घटनेनंतर  जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा (Women Security) प्रश्न ऐरणीवर आलाय. 

गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येत असलेल्या डाकराम /सुकळी येथील शाळेतील शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवले. तसेच  तिच्या अंगावर हात फिरवून लज्जास्पद  केल्याची  तक्रार विद्यार्थिनीने केली. त्यानंतर या शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ क्लिप  विद्यार्थीनीला दाखवले

 विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार,   22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घरी गेली असता तिचे शाळेतील शिक्षक  हे तिच्या मागे तिच्या घरी  आले. घरी आल्यानंतर  ती खुर्चीवर बसली असता सदर शिक्षकाने तिच्या घरी पलंगावर बसून तू तिथे का बसली आहे? माझ्या जवळ येऊन बस असे म्हटले. त्यानंतर  ही विद्यार्थिनी त्यांच्याजवळ जाऊन बसली असता या शिक्षकाने तुझे माझ्यावर प्रेम आहे का? प्रेम करणे चुकीचे नाही असे म्हणत आपले मोबाईलमधील काही अश्लील व्हिडिओ क्लिप विद्यार्थीनीला दाखवले.

शिक्षकाचे निलंबन

विद्यार्थिनीने ही व्हिडीओ क्लिप पाहण्यास नकार दिल्याने शिक्षकाने तिचे केस धरून तिला आपले जवळ ओढून तिला मिठी मारून अंगावरून हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीने 30 ऑगस्ट 2024 ला पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली. तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश मेश्राम याचे विरोधात अपराध क्रमांक 602 भारतीय नहिता कलम 74, 75, ((1)((3)78,79,332, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पोस्को), व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा नोंद करून सदर शिक्षकास अटक केली आहे. तर गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मुरुनंगथम एम. यांनी त्वरित सदर शिक्षकाचे विरोधात कार्यवाही करत त्याला निलंबन केले आहे.

हे ही वाचा :

Palghar Crime : आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय; नेहरोलीमधील धक्कादायक घटना

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget