एक्स्प्लोर

DRI Gold Racket: मुंबईत सोनं तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, DRI च्या 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मोठी कारवाई; 15 कोटींचं सोनं जप्त,11 जणांना अटक

Mumbai Gold Smuggling Racket: मुंबईत (Mumbai) 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई करत सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (Gold Smuggling Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे.

Mumbai Gold Smuggling Racket: मुंबईत (Mumbai) सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मोठं यश प्राप्त झाले आहे. 'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई करत सोनं तस्करी करणाऱ्या रॅकेटचा (Gold Smuggling Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11.88 किलो सोनं, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे असल्याची माहिती आहे. या सोबतच 8.77 किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे.

परदेशातून तस्करी (Gold Smuggling) करून आणलेले सोने गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून स्थानिक बाजारपेठेत विकले (Crime) जात असल्याची माहिती डीआरआयच्या (DRI Operation Bullion Blaze) तपासात समोर आली आहे. डीआरआयने दोन अवैध वितळवणी युनिट्सवरही छापे टाकले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.

'ऑपरेशन बुलियन ब्लेझ' अंतर्गत मुंबईत मोठी कारवाई (DRI Operation Bullion Blaze)

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) “ऑपरेशन बुलियन ब्लेझ” अंतर्गत मुंबईत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या सुव्यवस्थित सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी परदेशातून सोने भारतात तस्करी करून, गुप्त भट्ट्यांमध्ये वितळवून ते स्थानिक बाजारपेठेत बेकायदेशीरपणे विक्री करत होती. विशिष्ट माहितीच्या आधारे, 10 नोव्हेंबर 2025 रोजी DRI अधिकाऱ्यांनी मुंबईतील चार ठिकाणी एकाचवेळी कारवाई केली. ज्यामध्ये दोन अवैध वितळवणी युनिट्स आणि दोन अनधिकृत दुकाने आढळून आले. तसेच दोन्ही भट्ट्या पूर्णपणे कार्यरत अवस्थेत सापडल्या असून, वितळवणीसाठी आवश्यक सर्व साधनसामग्री उपलब्ध होती. DRI पथकाने तत्काळ कारवाई करून ठिकाणावरील ऑपरेटरला ताब्यात घेतले व सुमारे 6.35 किलो सोने जप्त केले.

त्यानंतरच्या कारवाईत, तस्करी केलेले सोने स्वीकारणे आणि वितळवलेले सोन्याचे बार स्थानिक खरेदीदारांना विकणे या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन दुकानांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका दुकानातून 5.53 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 11.88 किलो (24 कॅरेट) सोने ज्याची किंमत अंदाजे ₹15.05 कोटी रुपये आहे आणि 8.72 किलो चांदी (किंमत ₹13.17 लाख रुपये) जप्त करण्यात आली. सर्व मालमत्ता कस्टम्स अॅक्ट, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आली.

आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक, सरकारी महसूल फसविण्याच्या उद्देशाने कार्यरत?

या कारवाईत आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात टोळीचा मास्टरमाइंड, त्याचे वडील, व्यवस्थापक, चार वितळवणी कामगार, तस्करीच्या सोन्याचे लेखाजोखा ठेवणारा अकाउंटंट आणि तीन वितरण कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना मुंबईतील माननीय दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, ही टोळी भारताच्या सोन्याच्या आयात धोरणाचे उल्लंघन करून, सरकारी महसूल फसविण्याच्या उद्देशाने कार्यरत होती.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget