एक्स्प्लोर

सोने तस्करी करणाऱ्या टोळीचे पितळ उघड, 9.6 कोटी रुपयांचे 12 किलो सोने जप्त

डीजे लाईटमध्ये लपवण्यात आलेले 12 किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे.

Gold smuggling : डीजे लाईटमध्ये लपवण्यात आलेले 12 किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. यामुळं  सोने तस्करी (Gold smuggling) करणाऱ्या टोळीचे पितळ उघड झाले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 9.6 कोटी रुपये होती.

डीजे लाईटमध्ये लपवून चोरट्या मार्गाने नेण्यात येत असलेले 9.6 कोटी रुपये किमतीचे 12 किलो सोने मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय ), मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून जप्त केले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत, मालाची तपासणी केली असता प्रत्येक डीजे लाईटमधून सुमारे 3 किलो सोने हस्तगत करण्यात आले. त्यानंतरच्या तपासात एका गोदामाची झडती घेतली असता, त्याच पद्धतीचा वापर करून त्यासाठी केलेल्या खाचांमध्ये सोने लपवून तस्करीसाठी वापरण्यात येत असलेले,  68 डीजे लाईट्स आढळले.

मुंबईत एका आठवड्यात तस्करी केलेले सुमारे 48 किलो सोने जप्त 

संबंधित टोळीने  या पूर्वी देखील देशात  मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली असल्याचा संशय आहे. सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआय, मुंबईत गेल्या एका आठवड्यात तस्करी केलेले सुमारे 48 किलो सोने जप्त केले आहे. सोने तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धच्या कारवाईत उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे यातून दिसून येते.

गेल्या काही वर्षात सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ

सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत. गेल्या काही दिवसात देशात दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

सोन्याची तस्करी! 17 कोटी रुपयांच्या 23 किलो सोन्यासह 3 आरोपी जेरबंद, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई

 

 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
Sindhudurg News: दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget